MoRDesignLOGOjpg02_i0odk_5401

EXCLUSIVE COURSE FOR HOME DESIGN IN MARATHI

आपल्या  घराचं अंतराय कसं घडवाल ?

Complete course 'Interior Design of Home'

पहिलाच असा कोर्स.. तोही आपल्या मराठीतून !!.. आपल्या घराबद्दल प्रेम असलेल्या सर्वांसाठी..

कोर्स मध्ये काय शिकाल?

contents_mzodq_3282

***This is a Pre-launch  offer for first 30 buyers as Course will be launched in 2 weeks time***

Course Creator and Host

वास्तुविशारद वैशाली जोशी

आर्किटेक्ट वैशाली जोशी यांनी पुण्यातील सरकारी आर्किटेक्चर कॉलेज (BKPS College of Architecture) येथून १९९६ साली पुणे विद्यापीठाची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील School of Planningand Architecture मधून 'प्रॉडक्ट डिझाईन' मध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काल त्या आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, एग्झिबिशन डिझाईन, सेट डिझाईन, पॅकेजिंग डिझाईन अशी डिझाईन संबंधातील विविध काम त्यांनी हाताळलेली आहेत. एकूणच समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये डिझाईन संबंधी सजगता वाढावी यासाठी त्या विविध उपक्रमांद्वारे प्रयत्नशील असतात. डिझाईनर म्हणून काम करतांना विविध लोक आणि त्यांची जीवनशैली समजून घेणं आणि त्यांना उपयोगी पडेल असं काही आपल्या हातून घडणं .... ही त्यांची कामाची पद्धत! त्या गेली काही वर्ष 'डिझाईन' महाविद्यालयांमध्ये आणि नीती आयोगाअंतर्गत काही योजनांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतही आहेत. काही महाविद्यालयांना त्यांनी डिझाईन विषयक पदवी अभ्यासक्रमही बनवून दिलेला आहे.

' डिझाईन' हा आपल्या रोजच्या जगण्यातला भाग आहे. त्याविषयी सर्वांनाच थोडी तरी जाण असावी .. आपल्या रोजच्या जगण्यातही त्यामुळे खूप फरक पडू शकतो असं त्यांना वाटतं.


IMG20221026WA0059_u2mte_659
COURSEADD_cxoti_undefined

Benefits of Course
कोर्सचे फायदे 

  • तुमचा  घर विकत घेतांना , बिल्डरच्या लोकांशी बोलतांना त्यातील बाबी समजून घेण्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढलेला असेल.
  • तुम्ही तुमच्या चेक लिस्ट प्रमाणे पडताळून घरचा निर्णय घ्याल.
  • तुमच्या घरात काय करता येईल याचा तुम्ही प्रथमदर्शनी आणि नंतर बऱ्यापैकी खोल विचार तुम्ही करू शकाल.
  • आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या गरज आणि आवडी - निवडी अधिक चांगल्या पद्धतीने समजू  लागतील.
  • राहत्या घरामध्ये काय बदल केले तर अधिक उपयुक्त ठरेल? याची जाणीव.
  • विद्यार्थ्यांसाठी तर असंख्य 'take aways' आहेत. तुमच्या क्लायंटस्ना  आणि घराला तुम्ही अशा प्रकारे समजू शकलात तर अजून काय  पाहिजे प्रोफेशनल यशासाठी?
  • ***ज्या विद्यार्थ्यांना कोर्स केल्यानंतर प्रशास्तिपत्रक हवे असेल, त्यांना ते देण्यात येईल.

Bonuses You’ll Get In This Course

FORADDBOOK_ewntc_2874

BONUS 1 - INR 1500

E-BOOK.. absolutely free

जे डिझायनर नाहीत, पण ज्यांना आपल्या स्वतःच्या घरातील डिझाईन मध्ये कुतूहल आहे अशा सर्वांसाठी घराच्या 'इंटिरियर डिझाईन' विषयक अगदी बारकाईने सर्व गोष्टी समजावून देणारं पुस्तक येऊ घातलं आहे. अगदी बोली भाषेत,अनेक स्केचेसच्या सहाय्याने यांत गोष्टी सोप्या करून सांगितलेल्या आहेत.हे घराच्या इंटिरियर डिझाईनसाठी संपूर्ण मार्गदर्शन करणारे, घरासंबंधी कधीही हाताशी असावे असे पुस्तक सुरुवातीच्या ३० जणांना अगदी कमी किंमतीत मिळेल. ( कोर्स करणाऱ्यांसाठी मोफत) हे पुस्तक मुद्दामहून मराठीतून लिहिलेले आहे.पुस्तकाची छापील आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल, पण त्या आधी ई-बुक खास आपल्यासाठी!


BONUS 2 - INR 1500

Quiz/Questions after each section

प्रत्येक विभागानंतर पुढे जाण्यासाठी काही प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुमचे त्या विभागाचे आकलन किती झाले आहे ते तुम्हालाही कळून येईल. अशा प्रकारच्या प्रक्रियेमुळे विषय अधिक समजत जाईल.

BONUS 3 - Invaluable

Certificate after successful Completion

कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर त्याबद्दल प्राशस्तिपत्रक देण्यात येईल. विद्यार्थिमित्रांना आणि नवख्या डिझायनर्सना याचा फायदा होईल.

+Add Element

***This is a Pre-launch offer for first 30 buyers as Course will be launched in 2 weeks time***

काही नेहमीच विचारले जाणारे प्रश्न 

Q.1 हा कोर्स कोणासाठी आहे?

१. ज्यांनी घरे बूक केलेली आहेत आणि पुढे इंटिरियर डिझाईन करून घ्यायचा विचार सुरू आहे. 
२. जे अजूनही घर विकत घेण्याच्या विचारात आहेत आणि घरे बघत आहेत. 
३. जे स्वतः च्या घरात राहत आहेत पण नव्याने काही बदल करून घ्यायचे आहेत. 
४. 'इंटिरियर डिझाईन' कहा अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी. 
अशा सर्वांसाठीच हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे. 

Q.2 हा कोर्स का करावा?

लाखों किंवा कोट्यवधी रुपये खर्चून विकत घेतलेल्या जय घरात आपल्याला राहायचे आहे, ज्यावर आपण पुनः काही लाख खर्च करणार त्याबद्दल एवढी सजगात तर नक्कीच असावी. यामुळे पुढे जाऊन कोणी फसवल्याची खंत मनात राहणार नाही की कुठे आपल्याच गरज आधी नीट लक्षात न आल्याने घरात तडजोड करत राहावं लागणार नाही.
आणि विद्यार्थ्यांसाठी तर ही पर्वणीच आहे. इतकी स्केचेस आणि उदाहरणे असलेला हा विडिओ कोर्स त्यांच्या सर्व मूळ  संकल्पना  पक्क्या करेल. त्याच बरोबर आपल्या क्लायंटला कसं समजून घ्यावं याची व्यवस्थित तयारी होईल.

Q.3 हा कोर्स मराठीतून का?

आत्तापर्यंतच्या अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली की अशा विषयांचे लेखन किंवा कोर्सेस ही बहुतकरून इंग्लिश मधूनच असतात. अनेक जणांना इच्छा असूनही टेक्निकल इंग्लिश भाषेमुळे बारकाईने गोष्टी समजत नाहीत. 'इंटिरियर डिझाईन' म्हणजे काही फक्त छान छान फोटो बघून येणारी गोष्ट नाही. म्हणून, मुद्दामहून हा कोर्स प्रथमतः मराठीतून आणला आहे.. सर्व मराठी लोकांसाठी!

***This is a Pre-launch offer for first 30 buyers as Course will be launched in 2 weeks time***

MoRDesignLOGOjpg02_i0odk_5401

Terms of Use Privacy Policy

© 2022 Free Webinar. All Rights Reserved | Design by FlexiFunnels