वास्तुविशारद वैशाली जोशी
आर्किटेक्ट वैशाली जोशी यांनी पुण्यातील सरकारी आर्किटेक्चर कॉलेज (BKPS College of Architecture) येथून १९९६ साली पुणे विद्यापीठाची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील School of Planningand Architecture मधून 'प्रॉडक्ट डिझाईन' मध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काल त्या आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, एग्झिबिशन डिझाईन, सेट डिझाईन, पॅकेजिंग डिझाईन अशी डिझाईन संबंधातील विविध काम त्यांनी हाताळलेली आहेत. एकूणच समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये डिझाईन संबंधी सजगता वाढावी यासाठी त्या विविध उपक्रमांद्वारे प्रयत्नशील असतात. डिझाईनर म्हणून काम करतांना विविध लोक आणि त्यांची जीवनशैली समजून घेणं आणि त्यांना उपयोगी पडेल असं काही आपल्या हातून घडणं .... ही त्यांची कामाची पद्धत! त्या गेली काही वर्ष 'डिझाईन' महाविद्यालयांमध्ये आणि नीती आयोगाअंतर्गत काही योजनांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतही आहेत. काही महाविद्यालयांना त्यांनी डिझाईन विषयक पदवी अभ्यासक्रमही बनवून दिलेला आहे.
' डिझाईन' हा आपल्या रोजच्या जगण्यातला भाग आहे. त्याविषयी सर्वांनाच थोडी तरी जाण असावी .. आपल्या रोजच्या जगण्यातही त्यामुळे खूप फरक पडू शकतो असं त्यांना वाटतं.