



२५ वर्षांच्या अनुभवानंतर हा अनुभव सगळ्याच 'घर' उभरणाऱ्या लोकांच्या कमी यावा म्हणून जे डिझायनर नाहीत, पण ज्यांना आपल्या स्वतःच्या घरातील डिझाईन मध्ये कुतूहल आहे अशा सर्वांसाठी घराच्या 'इंटिरियर डिझाईन' विषयक अगदी बारकाईने सर्व गोष्टी समजावून देणारं पुस्तक येऊ घातलं आहे. अगदी बोली भाषेत,अनेक स्केचेसच्या सहाय्याने यांत गोष्टी सोप्या करून सांगितलेल्या आहेत.
हे घराच्या इंटिरियर डिझाईनसाठी संपूर्ण मार्गदर्शन करणारे, घरासंबंधी कधीही हाताशी असावे असे पुस्तक सुरुवातीच्या ३० जणांना अगदी कमी किंमतीत मिळेल. हे पुस्तक मुद्दामहून मराठीतून लिहिलेले आहे.
पुस्तकाची छापील आवृत्ती लवकरच प्रकाशित होईल, पण त्या आधी ई-बुक खास आपल्यासाठी!
पंचवीस वर्षांच्या अनुभवानंतर, शेकडो घराचं रूप पालटून झाल्यानंतर, हजारो लोकांशी जोडलं गेल्यानंतर आजही हेच लक्षात येतं, ज्या घरात आपण आयुष्याचा सर्वाधिक वेळ जगणार आणि जी आपली अशी जागा असणार.... त्याबद्दल लोक सजग नाहीत. स्वतच्या गरजा ओळखायला त्यांच्याकडे वेळच नाही... घर म्हणजे फक्त छान दिसणारी राहायची जागा नाही. ' माझं घर ' या शब्दातच ' माझं ' असं या जागेत काय असू शकेल? हा विचार व्हावा. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन मिळावं हा उद्देश.
काही उदाहरणे घेऊ, त्यातून काही शिकू. काही गोष्टी स्केचेस मधून समजून घेऊ. अनेक गोष्टींची चर्चा करू.
जसा प्रत्येक माणूस भेटला की तो जाणवतो , तसं प्रत्येक वास्तूमध्ये प्रवेश केला की ती आपल्याशी संवाद साधत असते. काहीतरी म्हणत असते, कधी स्वागत करते, कधी दूर लोटते, कधीतरी उगाचच अवघडल्यासारखे करून टाकते, कधी लक्षातही घ्यावसं वाटणार नाही इतकी नगण्य वाटते. तो त्या वास्तूचा 'स्व'भाव असतो. तो कशातून येतो? ही वातावरण निर्मिती कोणत्या घटकांमुळे होते? अगदी थोडक्यात हे ही समजून घेऊ.
बाजारात कितीतरी डिझायनर्स आणि संबंधित वस्तूंची रेलचेल आहे. निवड कशी करायची? खरं-खोटं कसं कळणार? यावर थोडा प्रकाश टाकू.
माझं घर माझं घर.. किती ही घरघर
पण 'मला' सुखावेल असंच हवंय 'माझं' घर!
याचं बघितलं... त्याचं बघितलं
म्हणून हे घेतलं नि तेही घेतलं,
हवंय का मला नक्की हे?
हे कुठे स्वतःला विचारलं?
माझी सोय व्हायला हवी
माझी सुविधा महत्त्वाची
पण म्हणजे नक्की काय,हे कुठे जाऊन शोधलं?
वेळ दिलाय का स्वतःसाठी
ऐकलाय का आवाज माझाच मी
कसं करायचं घर मी डिझाईन
या न कळलेल्या 'माझ्या'साठी?
मी बारावीनंतर पुण्यात पाच वर्ष वास्तुविद्या कॉलेजमध्ये आणि नंतर दिल्लीला दोन वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन अशी एकूण सात वर्ष डिझाईन शिकले. नंतर चौदा वर्षांची प्रक्टिस झाली होती, तरीही स्वतःचं घर डिझाईन करतांना एक वेगळीच सावध भावना निर्माण झाली होती. मलाही माझ्यासाठी मुंबईसारख्या जागेची नितांत चणचण असलेल्या शहरात फक्त सहाशे स्क्वेअर फुटांचं, एका मध्यमवर्गीय सोसायातीतले घर डिझाईन करायचे होते. अशी हजारो घरं मुंबईत रोजच नव्याने बनत असतात. माझ्यासाठीही ही गोष्ट अजिबातच नवीन नव्हती. पण 'माझं घर – डिझाईन ' मधला 'माझं' हा घटक मी नव्यानेच अनुभवत होते. या माझ्या राहत्या घराच्या डिझाईन चा प्रवास मला खूप काही नवीन शिकवून गेला. त्या निमित्ताने मला नक्की काय हवं आहे आणि का हवं आहे याचा शोध सुरू झाला. स्वतःमध्ये झाकून पहायला इथूनच सुरुवात झाली. 'आपल्याला कसे घर हवे आहे?' या प्रश्नाचं उत्तर शोधतांना 'आपल्या आतल्या घराला समजून घ्यायची' प्रक्रिया कधी सुरू झाली ते कळलेच नाही. घराचे इंटिरियर डिझाईन करतांना जर अशी सजगता असेल तर घराबरोबर स्वतःला बदलायची संधीही असू शकते याची प्रचिती 'माझं' घर बनवतांनाच आली. तुमच्याही प्रवासाची सुरुवात होऊ शकते.
आपण वेबिनारमध्ये ज्या गोष्टी, जे घटक थोडेफार समजून घेऊ, त्यासंबंधी आणि त्या व्यतिरिक्तही खूप आवश्यक अशा बाबींबद्दल सखोल चर्चा आणि विश्लेषण करणारा डिजिटल कोर्स बनवत आहे. यामध्ये सर्व सत्रे रेकॉर्डेड असतील. या कोर्स साठी आपणा सर्वांना खास सवलत मिळेल.
* कोर्स करणाऱ्यांना ई-बूक मोफत मिळेल.
* ज्यांना कोर्स केल्याचे प्रशास्तिपत्रक हवे असेल, त्यांना ते मिळू शकेल.

आपण वेबिनारमध्ये ज्या गोष्टी, जे घटक थोडेफार समजून घेऊ, त्यासंबंधी आणि त्या व्यतिरिक्तही खूप आवश्यक अशा बाबींबद्दल सखोल चर्चा वेबिनारमध्ये शक्य नाही. वेबिनरमुळे किंवा पुस्तकामुळे तुमची विचारचक्रे नक्कीच सुरू होतील आपण प्रश्नोत्तरांचा वेळसुद्धा ठेवणारच आहोत, पण यापुढे जाऊन ज्यांना आपल्या घराच्या संदर्भात drawings, photos आणि videos दाखवून घराच्या डिझाईन संदर्भात सखोल चर्चा करायची असेल, तर आता शक्य आहे. मी इथे मुंबईत बसूनच तुमच्या गरज समजून घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करू शकेन.यामध्ये, खालील बाबींवर मार्गदर्शन मिळेल -
१. तुमची जीवनशैली, आवडी-निवडी आणि तुमचे घर - प्राथमिक चर्चा
२. Lay out मध्ये काही बदल करून काही फायदा होण्याची शक्यता आहे का? ३. प्रत्येक खोलीमध्ये साधारणपणे काय काय शक्य आहे.
४. तुमच्या गरजेनुसार तुमचा खर्चाचा अंदाज , मटेरियल्स संबंधी मार्गदर्शन
५. तुमच्या घराच्या डिझाईन संदर्भात तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील , प्रश्न असतील तर त्याच्या संबंधी चर्चा
६. या वेळात तुम्हाला तुमच्या घराच्या इंटिरियर डिझाईनच्या कामासंदर्भात एक दिशा नक्कीच मिळून जाईल.
७. थोडक्यात, माझे दीड तास - सर्वस्वी तुमच्या घरासाठी!
विशेष सूचना - या चर्चेसाठी तुम्ही सह-कुटुंब बसू शकता.. घरासंबंधी घरातला प्रत्येक सदस्य उत्सुक असतो.

* क्लायंटच्या घरातील प्राथमिक गरजा आणि आवडी - निवडी शोधून काढण्यासाठी आम्ही जी प्रश्नावली तयार केली आहे, ती तुमच्यासाठी अगदी मोफत!
** उदाहरणादाखल एका प्रत्यक्ष प्रोजेकटची case study .. तुमच्यासाठी अगदी मोफत -
१. घरातील कुठल्या भिंती तोडू शकतो?
२. घरातील विविध जागांचे नियोजन कसे कराल?
३. संडास-न्हाणीघराच्या आराखड्यात बदल करतांना काय खबरदारी घ्यावी?
४. नव्याने भिंती उभ्या करतांना काय काय शक्यता असू शकतात?
*** खालील घटकांच्या काही टिप्स .. फक्त तुमच्यासाठी अगदी मोफत -
१. जमीन- काय पद्धतीच्या टाईल्सचा वापर करावा?
२. फॉल्स सीलिंग कसे केले म्हणजे खोली लहान झाल्यासारखी वाटणार नाही?
३. भिंतींचा फिनिश ठरवतांना काय खबरदारी घ्यावी?
४. नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशयोजना
५. रंग कसे निवडावे?

आर्किटेक्ट वैशाली जोशी यांनी पुण्यातील सरकारी आर्किटेक्चर कॉलेज (BKPS College of Architecture) येथून १९९६ साली पुणे विद्यापीठाची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील School of Planningand Architecture मधून 'प्रॉडक्ट डिझाईन' मध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेले आहे. गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काल त्या आर्किटेक्चर, इंटिरियर डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, एग्झिबिशन डिझाईन, सेट डिझाईन, पॅकेजिंग डिझाईन अशी डिझाईन संबंधातील विविध काम त्यांनी हाताळलेली आहेत. एकूणच समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये डिझाईन संबंधी सजगता वाढावी यासाठी त्या विविध उपक्रमांद्वारे प्रयत्नशील असतात. डिझाईनर म्हणून काम करतांना विविध लोक आणि त्यांची जीवनशैली समजून घेणं आणि त्यांना उपयोगी पडेल असं काही आपल्या हातून घडणं .... ही त्यांची कामाची पद्धत!
त्या गेली काही वर्ष 'डिझाईन' महाविद्यालयांमध्ये आणि नीती आयोगाअंतर्गत काही योजनांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतही आहेत. काही महाविद्यालयांना त्यांनी डिझाईन विषयक पदवी अभ्यासक्रमही बनवून दिलेला आहे.
' डिझाईन' हा आपल्या रोजच्या जगण्यातला भाग आहे. त्याविषयी सर्वांनाच थोडी तरी जाण असावी .. आपल्या रोजच्या जगण्यातही त्यामुळे खूप फरक पडू शकतो असं त्यांना वाटतं. आयुष्यातलं 'डिझाईन' समजायला लागलं की प्रवास अधिक प्रगल्भ होतो!

घर डिझाईन करणं मला सुरुवातीला सोपं असेल असं वाटलं होतं. आणि घरांपेक्षा हॉटेल्स किंवा ऑफिसेस जास्त खुणावत होते. पण मॅडम नी ज्या प्रकारे ' तुमच्यासाठी घर म्हणजे काय?' इथपासून सुरुवात केली, तेव्हा यातला गुंता लक्षात यायला लागला. हळूहळू आम्ही आमच्यातच डोकावून बघायला शिकलो. आधी आमची गरज आणि आवडी- निवडीचे विश्लेषण आणि कारण मीमांसा जमली तरच दुसऱ्यांची कळू शकेल ना? मला माझ्या आयुष्यात याचा खूप फायदा झाला आहे.


Vaishali Ma’am’s exceptional teaching methods and unwavering support were pivotal in shaping my journey as an interior designer. Her practical approach, combined with client-focused assignments and real-world scenarios, helped me discover my passion for residential design and refine my space planning skills. She simplified complex concepts, giving me the clarity and confidence to pursue my specialization. Her industry insights, valuable connections, and belief in my potential were instrumental in building the foundation for my career..


आमच्या घराचे डिझाईन हा आमच्या सर्व कुटुंबासाठी सुंदर प्रवास होता. सुरुवातीला खूप pinterest images साठवल्या होत्या. पण वैशालीबरोबर आम्हाला आमच्या गरज आणि आवडी-निवडी अजून उलगडत गेल्या. घरात काय 'नको' हे आधी ठरले. एक एक कोपरा नि प्रत्येक वस्तूचे मोजमाप, ती वापरायची पद्धत इथपासून प्रत्येक व्यक्तीच्या सवयी नि गरजा शोधून काढल्या. बाकी रंग, पोत, उजेड, वायू विजन अशा सर्व बाबी तर ओघाने आल्याच. पण घर हे कोणाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या आनंदासाठी आहे याची प्रचिती आम्हाला नवीन घरात रोज येते. भेट देणाऱ्या लोकांना ते आवडते हा भाग निराळा!


आमच्या घराचे डिझाईन हा आमच्या सर्व कुटुंबासाठी सुंदर प्रवास होता. सुरुवातीला खूप pinterest images साठवल्या होत्या. पण वैशालीबरोबर आम्हाला आमच्या गरज आणि आवडी-निवडी अजून उलगडत गेल्या. घरात काय 'नको' हे आधी ठरले. एक एक कोपरा नि प्रत्येक वस्तूचे मोजमाप, ती वापरायची पद्धत इथपासून प्रत्येक व्यक्तीच्या सवयी नि गरजा शोधून काढल्या. बाकी रंग, पोत, उजेड, वायू विजन अशा सर्व बाबी तर ओघाने आल्याच. पण घर हे कोणाला दाखवण्यासाठी नाही तर आपल्या आनंदासाठी आहे याची प्रचिती आम्हाला नवीन घरात रोज येते. भेट देणाऱ्या लोकांना ते आवडते हा भाग निराळा!






कुटुंबांची घरं तर नक्कीच घडवली असतील!
या घरांच्या डिझाईन मुळे हजारो लोक नक्कीच जोडले गेले असतील.. जे आजही तेव्हा बनवलेल्या घरांत आनंदाने रहात आहेत.
विद्यार्थ्यांना 'घर' याविषयी नक्कीच सजग केले असेल..

Architect, Designer, Design educator, Design Tinkerer and Home Specialist